रेल्वेच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्पन्नात होतेय भरघोस वाढ

नवी दिल्ली- गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात मिळालेले उत्पन्न आणि मालाचे प्रमाण याच्या तुलनेत यावर्षीची रेल्वेद्वारे होत असलेल्या मालवाहतुकीची आकडेवारी प्रभावित करणारी आणि सतत वाढता कल दाखवणारी आहे. रेल्वे विभागाने मालवाहतुकीचे अभियान चालवीत 8ऑक्टोबर 2020 पर्यंत केलेल्या सामानाचे प्रमाण आणि त्यातून मिळालेले उत्पन्न या दोन्ही बाबतीत गेल्यावर्षीच्या आकडेवारीला मागे टाकले आहे.

ऑक्टोबर महिन्यात 8 तारखेपर्यंत भारतीय रेल्वेने 26.14 दशलक्ष टन सामानाची वाहतूक केली. गेल्या वर्षी याच काळात रेल्वेने 22.1 दशलक्ष टन सामानाची वाहतूक केली होती. रेल्वेने मालवाहतुकीतून या वर्षी 2477.07 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले जे गेल्या वर्षीच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा 250.71 कोटी रुपयांनी जास्त आहे.
8ऑक्टोबर 2020 पर्यंत भारतीय रेल्वेने केलेल्या 26.14 दशलक्ष टन सामानाच्या वाहतुकीत 11.47 दशलक्ष टन कोळसा,3.44 दशलक्ष टन कच्चे लोखंड, 1.28 दशलक्ष टन अन्नधान्य 1.5 दशलक्ष टन खते आणि 1.56 दशलक्ष टन सिमेंट यांचा समावेश आहे.

जास्तीत जास्त उद्योगांनी रेल्वेने मालवाहतूक करण्याला प्राधान्य द्यावे यासाठी आकर्षक सवलती आणि शुल्कात सूट देखील जाहीर करण्यात येत आहे.कोविड -19 च्या संकटकाळाचा भारतीय रेल्वेने सर्व क्षमता वाढविण्यासाठी आणि कामगिरी उंचावण्यासाठी उत्तम उपयोग करून घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या –