जळगावात जास्त तापमान असल्याने केळी पिकासाठी, पीक विमा अंतर्गत भरपाई.

फायदे

 

जळगावात जास्त तापमान असल्याने केळी(Bananas) पिकासाठी,पीक विमा(Crop insurance) अंतर्गत भरपाई देण्यात येणार आहे.

जळगाव –          ह्यावर्षी महाराष्ट्रात उन्हाचे प्रमाण जास्त होते त्यातून पिकांना मोठा धोका(Big threat to crops) बसतो. जळगावमधील १४४ महसूल मंडळातील गावांना केळीची नुकसान(Damage to bananas) भरपाई देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली आहे. तसेच पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना २०२२ – २०२३ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील केळी(Bananas) पिकासाठी जास्त तापमान व हवामान धोक्यांतर्गत नुकसान भरपाई रकमेस पात्र ठरेल असे कृषी अधिकारी संभाजी ठाकूर म्हणाले.

दिनांक १ एप्रिल पासून ते ३० एप्रिल पर्यंत सलग ५ दिवस ४२ सेल्सिअस तापमान किंवा त्यापेक्षा अधिक तापमान असे तापमान असणारे ८३ महसूल मंडळ पात्र ठरली आहे. जे पात्र ठरलेत त्यांना ३५ हजार प्रतिहेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

दिनांक १ ते ३१ मी या कालावधीत सलग ५ दिववस ४५ अंश सेल्सिअस तापमान किंवा त्यापेक्षा अधिक तापमान असे तापमान असणारे ६१ महसूल मंडळ पात्र ठरली आहे. जे पात्र ठरलेत त्यांना ४३ हजार ५०० प्रतिहेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भारतीय कृषी विमा कंपनीस त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कम देण्याचे निर्देश दिले आहे.

महत्वाच्या बातम्या –