यवतमाळमध्ये रब्बी हंगामकरिता दरवर्षी 50 टक्के अनुदानावर बियाण्याचे वाटप केले जातात. यंदा भुईमूगाच्या बियाण्याच्या शासनस्तरावर अनुदान देण्यात संदर्भात संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे या अनुदानापासून शेतकरी वंचित राहण्याची दाट शक्यता वर्तविल्या जात आहे. भुईमुंगाचे पीक जानेवारीच्या अखेरीस पेरणे हे अपेक्षित असते. जर पेरणीस वेळ झाला तर उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता निर्माण होत असते.
शेतकऱ्यांनी पिकांची लागवड आता कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात करा
खाद्य तेलाचे भाव आकाशाला भिडले असतांना सुद्धा महाराष्ट्रात पिकणाऱ्या भुईमूग च्या पेरणीत कमालीची घट झाली आहे. अवकाळी पावसाने यंदा शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पिकाच्या एन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना स्वतः महागमोलाचे भुईमुंगाचे बियाणे घेऊन पेरणी करावी लागली.
पश्चिम वऱ्हाडातिला रेशीम पोहोचले कर्नाटकात
पाऊस जास्त असल्यामुळे धरणे, तलाव, नाले सध्या स्थितीत भरलेले असून सुद्धा पाण्याची मुबलक व्यवस्था असूनसुद्धा शेतकऱ्याला भुईमुगाची पेरणी मोठ्या प्रमाणात करता आला नाही. कारण बियान्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहे. यामुळे भुईमुंगचे उत्पादन चांगले होणार की नाही ही चिंता आता शेतकऱ्यांना सतावत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्याचा अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न https://t.co/zXrGXHELX1
— Krushi Nama (@krushinama) February 13, 2020