शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक; तिसऱ्या दिवसाचीही घोषणाबाजीने सुरवात

नागपूर : शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाचे सुरवातीचे दोन दिवस गदारोळात वाया गेले. तर आज सुद्धा विरोधकांनी सभागृहाच्या  पायऱ्यावर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हे नव्हं माझं सरकार’ हा बॅनर हातात घेऊन आणि पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घोषणाबाजी केली.
या घोषणाबाजीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे इतर दिग्गज नेतेही हजर होते. तसेच राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे हे नेतेही या घोषणाबाजीत सहभागी झाले होते.
या आंदोलनाला संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. जे काही बोलायचं ते सभागृहात चर्चा करून बोलूयात असे विरोधकांना सांगून सुद्धा विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती.