कृषी कायद्याच्या विरोधासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी ट्रॅक्टरवर स्वार होत संसदेत दाखल

कृषी कायद्याच्या विरोधासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी ट्रॅक्टरवर स्वार होत संसदेत दाखल Rahul Gandhi Drives Tractor

नवी दिल्ली –  कृषी कायद्याच्या विरोधासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी ट्रॅक्टरवर स्वार होत संसदेत पोहोचलेत. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवला. मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी मोदी सरकारचा विरोध केला.

राहुल गांधी म्हणाले, ‘मी शेतकऱ्यांचा संदेश संसदेत आणला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहेत. ते संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. त्यांना हे काळे कायदे रद्द करावे लागतील. संपूर्ण देशाला हे माहित आहे की हे कायदे २-३ बड्या उद्योजकांसाठी आहेत.

‘सरकारला वाटतंय की शेतकरी खूप देशातील शेतकरी समाधानी आहेत आणि आंदोलन करत असलेले शेतकरी अतिरेकी आहेत. वास्तवात मात्र, शेतकऱ्यांचे हक्क हिसकावले जात आहेत’.