कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन योग्य नियोजन करा – वर्षा गायकवाड

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी खासगी डॉक्टरांनी सहभाग देण्याचे आवाहन

हिंगोली – कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत वर्षा गायकवाड या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होणार

यावेळी पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या, इतर जिल्ह्यापेक्षा हिंगोलीतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी, मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शासकीय डॉक्टर व खासगी डॉक्टर यांच्याशी चर्चा करुन नियोजन करावे. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी देखील आपला सहभाग द्यावा, असेही आवाहन यावेळी पालकमंत्री यांनी केले.

सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु असुन या कालावधीत जिल्ह्यातील कंटेंन्मेंट झोन भागातील नागरिकांची तपासणी करावी. कोरोना विरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात वाढणारी रुग्ण संख्या कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही पालकमंत्री वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.

शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये

यावेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी खरीप हंगाम पेरणी, पाऊस, अतिवृष्टी नुकसान अनुदान वाटप, पीक कर्ज वितरण, कर्ज मुक्तीसह कोरोना विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख यांच्यासह जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या –

साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या ३ दिवसात जोरदार पावसाची शक्यता