कोरोना चाचणीचे दर होणार कमी

कोरोना

मुंबई – गेले ३ महिने कोरोना महामारीने राज्यासह देशभरात थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. तर, या कोरोना रोगाचे निदान होण्यासाठी लागणाऱ्या चाचणीचे दर सुरुवातीला सर्व सामान्यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे, जर कोरोना विरुद्ध लढा द्यायचा असेल तर त्यापासून बचावासह त्याचे निदान होऊन वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे माफक दरात व कमीतकमी वेळेत चाचणी होण्याची गरज लक्षात घेण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

आरोग्य विभागाने तातडीने याचा आढावा घेतला असून ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा दर १५०० रुपये तर आयजीजी अँटीबॉडी चाचणीचा दर २५० रुपयांपर्यंत निश्चित करता येऊ शकतो असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. याबाबतचा अंतिम अहवाल येत्या काही दिवसात सादर केला जाणार आहे.राज्य शासनाच्या पातळीवर गेल्या महिन्यात चाचणीचे दर ४५०० रुपयांवरून २२०० रुपये करण्यात आले असून हे दर आणखी कमी करावयाचे असल्यास केंद्र सरकारने ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी लागणारे रिएजंटस् व अन्य बाबींवरील जीएसटी व इतर शुल्क माफ केले पाहिजे.

रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग; जाणून घ्या

तसे केल्यास या चाचणीचा दर सध्याच्या २२०० रुपयांवरून १५०० रुपये होऊ शकतो असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच आयजीजी अँटीबॉडी चाचणीचा सध्याचा साडेपाचशे रुपयांचा दरही २५० रुपयांपर्यंत होऊ शकतो असे या अधिकाऱ्याने सांगितले. तामिळनाडू राज्यातही अशाच प्रकारे करोना चाचणीचे दर कमी करण्यात आले असून त्याचा अभ्यास करून लवकरच आरोग्य विभाग आपला अहवाल सादर करणार आहे.

या अहवालानुसार राज्य शासनाकडून चाचणीसाठी लागणार्या सामग्री वरील जीएसटी व अन्य कर मागे घेण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली जाईल. केंद्र शासनाने ही विनंती मान्य केल्यास अथवा हा भार राज्य शासनाने उचलण्यास करोना चाचण्यांचे दर निश्चित कमी होतील, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे.

तर, प्रामुख्याने मुंबईत दररोज किमान ३० हजार करोना चाचण्या झाल्या पाहिजेत असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुण्यामध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून जवळपास दहा हजार चाचण्या केल्या जात असून मुंबईतही येत्या काही दिवसात दहा हजार चाचण्या केल्या जातील असे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले. राज्यात आज शंभरच्या आसपास करोना चाचणी प्रयोगशाळा असून यात जवळपास निम्म्या प्रयोगशाळा खासगी आहेत.

छगन भुजबळांची ‘ही’ मागणी केंद्र सरकारने केली मान्य

दरम्यान, कमी चाचण्यांमुळेच सातत्याने कोरोना संसर्ग वाढत असून, मृत्यूचे प्रमाण सुद्धा अधिक आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील संसर्गाचा दर अगदी प्रारंभी जो 6 ते 7 टक्के होता, तो 8 जूनपर्यंत 17-18 टक्क्यांवर आला आणि आता 23 ते 24 टक्के. अर्थात 100 चाचण्यांमधून 24 जणांना कोरोनाचे निदान होते. मुंबईचा संसर्गाचा दर सातत्याने 21 ते 27 टक्क्यांवर स्थिरावलेला आहे. चाचण्यांची संख्या अतिशय कमी. 1 ते 19 जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी केवळ 5500 चाचण्या दररोज होत आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोनाबळींची संख्या दररोज सरासरी तेवढीच राहत आहे.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्यदायी जायफळ खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

जाणून घ्या ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे