राज्यातील ‘या’ शहरात होणार कोरोनाची चाचणी मोफत

कोरोनाच्या चाचण्या

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेतर्फे २ नोव्हेंबरपासून २४४ ठिकाणी मोफत कोविडविषयक वैद्यकीय चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे करोना चाचणी करण्याची सुविधा पालिका क्षेत्रात ३०० पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध होईल.

पालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये अशा एकूण २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.दरम्यान,सुरुवातीला दररोज सकाळी 10 ते 12 या कालावधीदरम्यान या 244 ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा ‘वॉक इन’ पद्धतीने उपलब्ध असणार आहे.

कालपासून 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे असल्यास नागरिक महापालिकेच्या हेल्पलाईनवर किंवा 1916 या क्रमांकावर संपर्क साधावा.मुंबईत आतापर्यंत केवळ 54 ठिकाणी कोरोनाची चाचणी केली जात होती. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणारे येणारे विविध दवाखाने, रुग्णालयांसह एकूण 244 ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यामुळे मोफत कोरोना चाचणीच्या ठिकाणींची संख्या वाढून जवळपास 300 होणार आहे.

या 244 ठिकाणांची माहिती http://stopcoronavirus.mcgm.gov.in या वेबसाईटवरुन आणि विभागीय हेल्पलाईनद्वारे किंवा 1926 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोविडची लक्षणे असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधून मुंबईकरांना आपल्या घराजवळच मोफत कोरोना चाचणी करता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –