राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुलुंड येथील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात जनसामान्यांची विविध प्रकारे निःस्वार्थ सेवा करणाऱ्या मुलुंड उपनगरातील 28 कोरोना योद्ध्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

श्री. चंद्रकांत कोटेचा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोरोना योद्ध्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष व आमदार मिहीर कोटेचा व सचिव दिपेश वोरा यावेळी उपस्थित होते.

सेवा करण्याची भावना मनात उद्भवणे फार महत्त्वाचे असते. भाव तेथे देव असतो. संपत्ती पेक्षा श्रद्धा, समर्पण व त्याग मोठा आहे. कोरोना कालावधीत कोरोना योद्ध्यांसोबतच स्वयंसेवी संस्थांनी चांगले काम केले. कोरोना योद्ध्यांनी यापुढेही समाजकार्य सुरूच ठेवावे तसेच आपल्या कार्यातून इतरांना समाजसेवेसाठी प्रवृत्त करावे. कोरोनाचा मुकाबला निर्भयतेने परंतु पुरेशी काळजी घेऊन केला पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी जयेश गणात्रा, राहुल जोशी, मयुर धुल्ला, अमिता शहा, जितुभाई महेता, किरण ठक्कर, माया कोठारी, रमेश मेहता, डॉ. हेमंत वेखंडे, डॉ. सरिता भिंगे, नंदकुमार वैती, डॉ. विदिशा तायडे, सचिन नेहरे, कौशिक ठक्कर, निपम  भट्ट, चेतना त्रिवेदी, एल्विस कुंदर, रवि  नाईक, भावना शहा, दर्शना राठोड, कपिला कोठारी, तेजल बाखाई, दिपिका घाग, प्रकाश मोटे, दिपक सचदेवा, नारायण मेघारे, अनुप थारवानी आणि पियुष वोरा यांचा सत्कार करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या –