कोरोना आजार वाढवतोय पुन्हा देशाची चिंता ? देशभरात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ.

कोरोना

नवी दिल्ली-    गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे(Covid) एकूण 4,270 नवीन रुग्ण आढळले(A total of 4,270 new corona patients were found across the country). त्याचबरोबर 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 2,619 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. देशातील एकूण कोरोना(Covid) रुग्णांची संख्या 4,31,76,817 वर पोहोचली असून एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 24,052 वर पोहोचली आहे. काल देशात कोविडचे ३,९६२ नवीन रुग्ण आढळले. या पार्श्वभूमीवर आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

यासह, भारतातील एकूण कोरोना(Covid) रुग्णांची संख्या 4,31,76,817 वर पोहोचली आहे. सध्या कोरोनाचे(Covid) 24,052 सक्रिय रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत 5,24,692 लोकांचा कोरोनामुळे(Covid) मृत्यू झाला आहे. लसीकरण कार्यक्रमांतर्गत एकूण 1,94,09,46,157 डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 4,13,699 चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर एकूण चाचणीचा आकडा 85.26 कोटींवर पोहोचला आहे.

भारतात कोरोना लसीकरण(Covid vaccination)कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 193.83 कोटींहून अधिक डोस लागू करण्यात आले आहेत, गेल्या 24 तासांत कोरोना(Covid) लसीचे 11,67,037 डोस लागू करण्यात आले आहेत. देशात 7 ऑगस्ट 2020 रोजी कोरोना विषाणू-संक्रमित रुग्णांची संख्या 20 लाख तर 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांवर गेली होती.

महत्वाच्या बातम्या –