कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं ‘कोरोनिल’, रामदेव बाबांनी जगासमोर ठेवले कोरोनावरील औषध

रामदेव बाबा

नवी दिल्ली – कोरोनासारख्या जीवघेण्या साथीच्या रोगावर जगभरात उपचार करण्यासाठी असंख्य प्रयत्न सुरू आहेत, परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजली कोरोनावर आधारित कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं ‘कोरोनिल’ जगासमोर आणणार आहे. आचार्य बालकृष्ण यांनी स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत हे आज हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लॉन्च केले आहे.

खतांअभावी वाढली शेतकऱ्यांची डोकेदुखी; सरकारचे झोपेचे सोंग

पतंजली योगपीठाने दावा केला होता की, त्यांना कोविड – 19 ला रोखण्याचे औषध सापडले आहे आणि ते प्रभावीदेखील ठरले आहे. कोविड – 19 विषाणूविरोधात प्रभावी औषध आणि लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनलॉक सुरू झाल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. जर पतंजली योगपीठाचा दावा खरा ठरला तर देशातील लाखो लोकांना मोठी मदत मिळणार आहे. शिवाय अर्थव्यवस्थाही पुन्हा रुळावर येऊ शकेल.

मागेल त्याला शेततळे योजनेच्या कामाला सरकारचा ‘ब्रेक’

रामदेव बाबा यांनी असा दावा केला आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण या औषधाच्या वापराने 3 दिवसांच्या आत बरे होतील. पुढच्या 7 दिवसांत कोरोना रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी जाईल. कोरोनिल औषध सकाळी आणि संध्याकाळी एकदा घेतलं जाऊ शकतं. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं. तर गिलोय संक्रमण कमी करण्यास मदतगार आहे.

 महत्वाच्या बातम्या –

सूक्ष्म सिंचनासाठीच्या ४००० कोटींच्या निधीस मंजुरी ; केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली माहिती

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा – छगन भुजबळ