जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

कोरोना

पुणे – पुणे शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. एप्रिल महिन्यात दिवसाला सात हाराजांहून अधिक नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आल्याने स्थिती गंभीर होत होती. यांनतर मे महिन्याच्या मध्यापासून कोरोना आकडेवारीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शेकड्यांमध्ये असलेली आकडेवारी ही कमी-अधिक होत असून कोरोना स्थिती पूर्ण आटोक्यात येणे गरजेचे आहे.

गेल्या २४ तासात पुणे जिल्ह्यात ३३५ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७५ हजार ९०२ झाली आहे. तर नव्याने २६० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८७ हजार १६५इतकी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात  ८ हजार ४५० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याची  एकूण टेस्ट संख्या आता २८ लाख ८१ हजार २८९ इतकी झाली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या २ हजार ४९६ रुग्णांपैकी २२० रुग्ण गंभीर तर ३३९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर, पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ७६७ इतकी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –