जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात तब्ब्ल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

कोरोना

पुणे – पुणे जिल्ह्यात काल नव्याने २७६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे जिल्ह्यातील एकूण संख्या आता ४ लाख ८४ हजार ३५६ इतकी झाली आहे. शहरातील ३१० कोरोनाबाधितांना काल डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७२ हजार ८३९ झाली आहे. पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवसात ७ हजार १७८ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याची एकूण टेस्ट संख्या आता २७ लाख ९९ हजार १८७ इतकी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या २ हजार ८१५ रुग्णांपैकी २२९ रुग्ण गंभीर तर ३८९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ७०२ इतकी झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणात महाराष्ट्राने काल पुन्हा विक्रम केला आहे. राज्यात चार कोटींचा टप्पा पार केला. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 24 हजार 701 लसींचे डोस देण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –