जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ नव्या कोरोना रुग्णांची वाढ

कोरोना

पुणे – पुणे जिल्ह्यात काल नव्याने ३३१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे जिल्ह्यातील एकूण संख्या आता ४ लाख ८२ हजार ५८२ इतकी झाली आहे. शहरातील २७७ कोरोनाबाधितांना काल डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७० हजार ९९७ झाली आहे.

पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवसात ८ हजार ०९९ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याची एकूण टेस्ट संख्या आता २७ लाख ५४ हजार ९७६ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या २ हजार ९१७ रुग्णांपैकी २२७ रुग्ण गंभीर तर ५१८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ६६८ इतकी झाली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात असताना कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. पण, जुलै महिन्यात मोठा दिलासा मिळाला आहे. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही. प्रत्येक जिल्ह्यांतून 100 नमुने तपासणी सुरू आहे. मागील महिन्यात 21 रुग्ण आढळले होते. पण आता नवीन रुग्ण आढळले नाही’ असे सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या –