या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच; काल दिवसभरात १४ मृत्यूसह ७५६ नवे बाधित

कोरोना

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार घातला आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात ७५६ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४१ हजार ४०६ एवढी झाली असून आत्तापर्यंत ३६ हजार १५७ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल ५१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३२ टक्के इतके झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ६७९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून काल दिवसभरात कोरोनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. रोज ८०० ते ९०० कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालये व कोविड सेंटर सध्या फुल आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १६०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३६ आणि अँटीजेन चाचणीत ३६० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६७, अकोले १७, जामखेड ८, कर्जत १,कोपरगाव २, नगर ग्रामीण १३, नेवासा ६, पारनेर १, पाथर्डी ७, शेवगाव ५, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ९, कॅंटोन्मेंट २ आणि मिलिटरी हॉस्पिटल ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ८७, अकोले ४, जामखेड ३, कर्जत ८, कोपरगाव ३, नगर ग्रामीण २४, नेवासा १५, पारनेर ०७, पाथर्डी ९, राहाता १८, राहुरी १९, संगमनेर २, शेवगाव २, श्रीगोंदा २, श्रीरामपूर ३२ आणि मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत बाधित आढळूनआलेल्या रुग्णांमध्ये मनपा २६, अकोले १८, जामखेड २१, कर्जत १४, कोपरगाव २५, नगर ग्रामीण १८, नेवासा १६, पारनेर १७, पाथर्डी ३८, राहाता ३२, राहुरी ९, संगमनेर ५६, शेवगाव ३६, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २३ आणि कॅन्टोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –