‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात तब्ब्ल ‘इतक्या’ नव्या रुग्णांची वाढ

कोरोना

बीड – कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच मृत्यू दर देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कधी रुग्ण संख्या कमी तर कधी जास्त असं सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. बीडमध्ये तब्बल ३३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच १११८ नवे रुग्ण निष्पन्न झाले, तर ११८४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सोमवारी नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने दिलासा मिळाला.

जिल्ह्यत रविवारी ४ हजार ४०३ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल सोमवारी दुपारी प्राप्त झाले. यात ३ हजार २८५ अहवाल निगेटिव्ह आले तर १११८ अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ३३०, अंबाजोगाई ६७, आष्टी ९६, धारूर ८०, गेवराई ८६, केज १०५ माजलगाव ९६, परळी ३५, पाटोदा १२५, शिरुर ६६ आणि वडवणी तालुक्यातील ३२ जणांचा समावेश आहे. सोमवारी जुन्या २६ व २४ तासांतील ७ अशा एकूण ३३ मृत्यूंची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. तसेच दिवसभरात ११८४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आता एकूण बाधितांचा आकडा ७५ हजार ५४० इतका झाला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६७ हजार ७८५ इतकी झाली आहे.

कोरोना सोबतच आता म्युकरमायकोसीस हा आजार सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरत आहे. ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे अशांना म्युकरमायकोसीस हा आजार होण्याची शक्यात जास्त आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच कोरोना पासून बचावा साठी आवश्यक ती सर्व काळजी घेणे गरजेचे आहे. येथील स्थानिक प्रशासन नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन करत आहे.

महत्वाच्या बातम्या –