‘या’ जिल्ह्यात कोरोनाचे दररोज नवे रेकॉर्ड; गेल्या २४ तासात कोरोना रुग्ण संख्येत मोठी भर

कोरोना

जालना – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, रोज मोठया संख्येत रुग्ण बाधित होत आहेत. कोरोना दररोज नवे रेकॉर्ड करत असून रविवारी उच्चांक गाठत ९०९ रुग्ण बाधित आढळले तर ७ जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३७ हजार ८०४ वर गेली असून मृतांचा आकडाही ६१८ एवढा झाला आहे. दरम्यान, दिवसभरात बरे झालेल्या ४५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत २९ हजार ७२५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जालना तालुक्यातील २४२, मंठा ९१, परतूर ८३, घनसावंगी १४५, अंबड २११, बदनापूर ५२, जाफराबाद २९, भोकरदन ४२ तसेच इतर जिल्ह्यांतील १४ अशाप्रकारे आरटीपीसीआरद्वारे ६१३ तर अँटिजेनमधून २९६ असे एकूण ९०९ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २ लाख ५२ हजार ३४५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३७ हजार ८०४ अहवाल पॉझिटिव्ह, तर २ लाख १२ हजार ११६ निगेटिव्ह आले.

संस्थात्मक अलगीकरणात ६३६ जणांना पाठवले : राज्य राखीव पोलिस बल क्वाॅर्टर ए ब्लॉक -५५, बी ब्लॉक – ३६, सी ब्लॉक – ४३, डी ब्लॉक-५५, के.जी.बी.व्ही परतूर -२१, के.जी.बी.व्ही. मंठा -३०, शासकीय तंत्रनिकेतन अंबड -१३८, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर -२५, डॉ. बाबासाहेब आंबेडकर घनसावंगी -५७, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह घनसावंगी – ९५, के.जी.बी.व्ही. घनसावंगी – ५९, शासकीय मुलांचे वसतिगृह एमआयडीसी इमारत क्र.१- ८, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारत क्र. २ भोकरदन -१२, आयटीआय कॉलेज जाफराबाद -२ अशी अलगीकरणात पाठवलेल्या रुग्णांची संख्या आहे.

महत्वाच्या बातम्या –