‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासात १२१० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

कोरोना

नांदेड – जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. शुक्रवारी ४ हजार ५०९ अहवालापैकी १ हजार २१० अहवाल कोरोना बाधीत आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ८९५ तर अँटिजेन तपासणीद्वारे ३१५ अहवाल बाधीत आहेत. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ७४ हजार १०० एवढी झाली असून यातील ५७ हजार २७३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजघडीला १३ हजार ८५२ रुग्ण उपचार घेत असून २४८ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

शुक्रवारी बाधीतांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ४९६, नांदेड ग्रामीण २५, अर्धापूर ४५, भोकर २०, बिलोली ३, देगलूर ४८, धर्माबाद ३५, हिमायतनगर ५, कंधार ५६, किनवट २, लोहा ४२, मुदखेड १, मुखेड ११, नायगाव २४, उमरी २, हदगाव ६८, हिंगोली ५, लातूर १, अकोला १, यवतमाळ १, परभणी ३, निजामाबाद १ असे एकूण ८९५ बाधीत आढळले.

आजच्या बाधीतांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात ४५, नांदेड ग्रामीण १३, अर्धापूर ३, भोकर ६, बिलोली २, देगलूर ७, धर्माबाद ५, हदगाव १९, हिमायतनगर २, कंधार ११, किनवट ५२, लोहा १८, माहूर २९, मुदखेड १७, मुखेड २६, नायगाव ३१, उमरी १९, नागपूर २, मुंबई २, अमरावती १, यवतमाळ १, हिंगोली २, परभणी व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे ३१५ बाधीत आढळले.

महत्वाच्या बातम्या –