जालना – राज्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हळूहळू वाढत असला तरी चिंता किंवा काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. पण पॉझिटिव्हिटी दर वाढतोय त्याअर्थी टेस्टिंग रेटही वाढवला पाहिजे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री यांना टेस्टिंग वाढवण्याबाबत सुचवले असून मुख्यमंत्र्यांनीही हे मान्य केले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही यात लक्ष द्यावे, अशा सूचना केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, २४ तासांत राज्याची स्वॅब टेस्टिंगची क्षमता २ लाखांहून अधिक आहे, ती सध्या सव्वा-दीड लाख पाहायला मिळत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने टेस्टिंग केल्याच पाहिजेत. जालना जिल्ह्याचा विचार करता आपण दर आठवड्याला बैठक घेतो. तसेच प्रयोगशाळेची दोन-अडीच हजार टेस्टिंगची जी क्षमता आहे ती पूर्णपणे वापरली गेली पाहिजे, अशा सूचना दिल्याचे ते म्हणाले.
मराठवाड्यामध्ये शिक्षण, आरोग्य सुविधा, तसेच दरडोई उत्पन्न वाढविण्याबरोबरच उद्योगांच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार निर्मिती होणेही गरजेचे आहे. आपल्या मराठवाडा विभागाबरोबरच जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास अधिक जलदगतीने होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहनही टोपे यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात पुन्हा एकदा पावसाचं दमदार कमबॅक होणार; ‘या’ दिवसापासून राज्यात जोरदार पाऊस पडणार
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी – दत्तात्रय भरणे
- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु – वर्षा गायकवाड
- अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निश्चितच मदत मिळणार – संजय बनसोडे