पुढील काही महिन्यामध्ये करोनाची परिस्थिती अधिक चिंताजनक

बिल गेट्स

नवी दिल्ली – गेले वर्षभर कोरोनाने जगात हाहाकार माजवला आहे. जवळजवळ सर्वच देशांत या कोरोनाचा शिरकाव झाला आणि लाखो लोकांना आपला प्राण गमवावा लागला. कोणतंच प्रभावी औषध नसल्यानं या रोगाची तीव्रता वाढली होती. या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी जणू सर्व जगचं थांबल होतं.

मात्र, गेल्या महिन्याभरात दिलासादायक वृत्त हाती येत असून शास्त्रज्ञांना लस शोधण्यात यश येत आहे. भारतीय बनावटीच्या दोन लस देखील लवकरच उपलब्ध होणार आहेत. अशातच, आता आणखी दिलासादायक वृत्त हाती येत आहे. कशी पाठोपाठ आता कोरोनावरील औषध देखील शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे.

याच पार्शवभूमीवर  मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह संस्थापक बिल गेट्स यांना रविवारी एका मुलाखतीमध्ये करोना विषाणूच्या साथीमुळे ही पुढील चार ते सहा महिन्यामध्ये परिस्थिती अधिक चिंताजनक होईल अशी भीती व्यक्त केलीय. गेट्स यांची संस्था करोनाची लस विकसित करण्यासाठी आणि ती जगभरामध्ये उपलब्ध करुन देण्याची वितरण साखळी उभारण्यासाठी सध्या काम करत आहे. अमेरिकेमधील करोना संकटाची दिवसोंदिवस बिघडणारी परिस्थिती पाहून गेट्स यांनी हा इशारा दिला आहे

बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष असणाऱ्या बिल गेट्स यांनी सीएनएनला एक विशेष मुलाखत दिली. यामध्ये बिल गेट्स यांनी, “या साथीच्या काळावधीचे पुढील चार ते सहा महिने परिस्थिती अंत्यत वाईट होऊ शकते. आयएचएमआय (इंस्टिट्यूट फॉर हेल्थ मैट्रिक्स अँड एवेल्यूएशन) च्या अंदाजानुसार या कालावधीमध्ये करोनामुळे दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो. आपण मास्क घातलं नाही, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले तर मृत्यूचा हा आकडा नियंत्रणामध्ये आणू शकतो,” असं मत व्यक् केलं.

मागील काही आठवड्यांमध्ये अमेरिकेत करोनाचा संसर्ग झाल्याचे, मृत्यूचे आणि रुग्णालयामधील अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. “ही परिस्थिती अमेरिका चांगल्या पद्धतीने हाताळेल असं मला वाटतं,” असं मतही बिल गेट्स यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे गेट्स यांनी करोनासारखी मोठी साथ येईल अशी भविष्यवाणी २०१५ मध्येच केली होती.

महत्वाच्या बातम्या –