‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ

कोरोना

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात ९२३ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ हजार ८२ एवढी झाली असून आत्तापर्यंत ३४ हजार १२५ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात काल ७४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३७ टक्के इतके झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ६४४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून काल दिवसभरात कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १७०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४२३ आणि अँटीजेन चाचणीत ३३० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका ७२, संगमनेर ४, नगर ग्रामीण ८, श्रीरामपूर ५, नेवासे १, श्रीगोंदे ८, पारनेर ३, अकोले १४, राहुरी २, कोपरगाव ८, जामखेड १०, मिलिटरी हॉस्पिटल ३५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १४९, संगमनेर ३५, राहाता १५, पाथर्डी ९, नगर ग्रामीण ३६, श्रीरामपुर २९,  कॅंटोन्मेंट ६, नेवासे २६, श्रीगोंदा ४, पारनेर २३, अकोले १०, राहुरी ४१, शेवगाव ९, कोपरगाव ७, जामखेड १८ आणि कर्जत ६ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये, मनपा २९, संगमनेर २७, राहाता ५०, पाथर्डी १८, नगर ग्रामीण १८,  श्रीरामपूर १३, कॅंटोन्मेंट ५, नेवासे १२, श्रीगोंदे ११, पारनेर १२, अकोले ३४, राहुरी १२, शेवगाव १९, कोपरगाव १९, जामखेड ३५ आणि कर्जत १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –