शेतकऱ्यांच्या मृत्यूंना सडलेली सरकारी व्यवस्था जबाबदार – किशोर तिवारी

मुंबई:यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटकनाशक फवारणी करताना झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूला मागील तीन दशकातील कृषी क्षेत्रातील चुकीचे धोरण व सडलेली शासकीय व्यवस्थाच जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात केला आहे .

या अहवालात तिवारी यांनी पुरावेही सादर केले आहेत . या कीटकनाशकाच्या विषबाधेचा अख्ख्या विदर्भ-मराठवाड्यामध्ये सरकारची कोणतीच परवानगी नसलेले राउंड अप बी टी ची गुजरातमधुन झालेली व महाराष्ट्रात सरकारने बंदी घातलेले राशी कंपनीचे बी टी बियाणांचा १० लाख हेक्टरमध्ये झालेला बेकायदेशीर पेरा ,त्यावर आलेला थिप्स ,मिलीबग ,जासीड , बोडअळीचा बेभान हल्ला ,पर्यावरणाच्या बदल ,कृषीखात्याचा शेतकऱ्यांशी तुटलेला संवाद ,आरोग्य विभागाने ओर्गनोफास्फोरस गटाच्या प्रोपोनोपास या प्रकारच्या कीटकनाशकामुळे विषबाथेचा रुग्णावर अँटिटोड म्हूणन देण्यात येणारे अल्ट्रोपीन या औषधाचा भडीमारामुळे मेंदु ,किडनी ,दृष्टीवर परीणाम झाल्याने मेलेल्यांची संख्या या सारख्या प्रमुख मुद्द्यांचा अहवालात समावेश करण्यात आला आहे .या मृत्यूंना हत्याकांडाला चुकीचे धोरण व सडलेली शासकीय व्यवस्था असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे .

 शेतकरी मिशनच्या एकात्मिक कार्यक्रमाच्या प्रमुख शिफारशी 

१) संपुर्ण शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ -मराठवाड्यात रासायनिक शेतीला तात्काळ बंदी घालणे व विषमुक्त नैर्सगिक झिरो बजेट शेतीसाठी प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान ५ वर्ष देण्यात यावे ,सारे विषमुक्त कृषीमालाची सरकारकडून खरेदी करण्यात यावी .

२)  विदेशी कापसाच्या वाणांवर तात्काळ बंदी व देशी कापसाच्या बियाणांचा कृषी विभाग ,कृषी विद्यापीठ- कापूस संशोधन केंद्र ,महाबीज कडून १०० टक्के पुरवढा करण्यात यावा .

३)  डाळीच्या ,विदर्भ -मराठवाड्याच्या मिलेट वर्गीय ,तैल वा अन्नाच्या पिकासाठी विषेय कार्यक्रम राबविणे

४)  हर्बल कीटकनाशकांच्या व गोमुत्र -आधारीत आयुर्वेदिक कीटकनाशकाच्या वापराची सक्ती व त्यासाठी अनुदान देण्यात यावे .

५) विषमुक्त अन्नाच्या विक्रीसाठी प्रत्येक गावपातळीवर विक्रीव्यवस्था ,पतपुरवडा ,तारण व्यवस्था तात्काळ निर्माण करण्यात यावी .

६) सध्या आरोग्यविभागाद्वारे चुकीच्या औषधाचा भडीमारामुळे मेंदु ,किडनी ,दृष्टीवर झाल्याच्या घटनांची संपूर्ण चौकशी व योग्य ऍंटीडोडचा तात्काळ पुरवढा करण्यात यावा .

७)बियाणे ,कीटकनाशक ,रासायनिक खत ,प्लांट ग्रोथ नियंत्रकाची नावावर होत असलेली लूट रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस ,प्रशासन यांच्या नियंत्रातील यंत्रणा तात्काळ तयार करण्यात यावी .

८) बियाणे ,कीटकनाशक ,रासायनिक खत ,प्लांट ग्रोथ नियंत्रका नियमबाह्य रीतीने विक्रीकरण्यासाठी कृषीखात्याचे नियंत्रन ठेवणारे अधिकारी सर्व कृषी केंद्राकडून , ठोक विक्रेते ,निर्माता कंपन्यायांचेकडून कोट्यवधी रुपयाचा हप्ता घेत असल्याच्या गंभीर तक्रारी सरसकट लाजलुचपत खात्यामार्फत चौकशीला व आयकर विभागाला देण्याची शिफारशी मिशनने केली आहे .

९) वैद्यकीय महाविद्यालय ,जिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवा तात्काळ न दिल्यामुळे ,अनेक रुग्णाना चुकीचे ऍंटीडोड व औषधी दिल्यामुळे मृत्यु झाल्याच्या वा दृष्टी गमावल्याच्या तक्रारी आल्याची माहीती डॉक्टरांच्या समितीकडुन चौकशी करण्याची शिफारस मिशनने केली आहे .