नागपुरात कपाशीला गुलाबी बोंडअळीचा धोका

नागपुरात कपाशीला गुलाबी बोंडअळीचा धोका bondali

कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख पिकंन पैकी एक आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये खरीप हंगाम मध्ये नागपूर विभागात ६ लाख ७१ हजार क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. कापूस पिकावर गेल्या वर्षीच्या तुलनेत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला असला तरी या किडीचे समूळ उच्चाटन झालेले नाही. या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे, अन्यथा ही कीड शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकते असे सांगण्यात येत आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करणार- मुख्यमंत्री

या किडीचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाट्या श्रेडर, रोटावेटर यासारख्या यंत्राद्वारे जमिनीत गाडाव्यात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास तसेच गुलाबी बोंडअ ळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होईल. पाच ते सहा महिने कापूसविरहित शेत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्टात येते.

कापसाची खेडा खरेदी गतीने सुरू, दर ५१०० वर स्थिर

गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असून, कापूस उत्पादनातील सर्व यंत्रणा जसे शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, कापूस पीक संशोधन संस्था, बियाणे उत्पादक कंपन्या, कीटकनाशक कंपन्या, कापूस खरेदी केंद्रे , गोडाऊन, जिनिंग, प्रेसिंग मिल्स इत्यादी संस्थांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही भोसले यांनी म्हटले आहे.