‘या’ जिल्ह्यामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले ‘हे’ मोठे आवाहन

जनावरांचे शेण

वाशीम – जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव मोठय़ाप्रमाणावर दिसून येत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सदर आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी गावातील गोठय़ामध्ये सायपर मेथीनची फवारणी करण्यात येत असुन ग्रामविकास विकास अधिकारी, ग्रामसेवक यांना आदेशित करण्यात आले असून सरपंचांनी देखिल याबाबत जागृत राहुन आपल्या गाव परिसरातील जनावरांच्या गोठयांची फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले आहे.

लम्पी स्किन डिसीजचा आजार विषाणुजन्य व संसर्गजन्य असुन त्याचा प्रसार गोचिड, गोमाशा व चावणार्‍या किटाणुपासुन होतो. त्यामुळे जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरपंच, गाव पुढार्‍यांनी पुढाकार घेवुन आपल्या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केली अगदी त्याच प्रमाणे लम्पी स्किन डिसीज आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. पशु सवंर्धन विभागाच्या वतीने ग्राम स्तरावर लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.

सदर आजारावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामविकास विकास अधिकारी, ग्रामसेवक यांना आदेशित करण्यात आले. पशुपालंकांनी देखील आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, किरकोळ आजार दिसुन आल्यास जवळच्या पशु वैद्यकिय रुग्नालयाशी संपर्क साधावा, त्यामुळे कुणीही घाबरुन न जाता आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –