जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्यामुळे तब्बल १९ हजार ४७८ हेक्टरवर पिकांचे नुकसान

मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी (Premature) पाऊस  पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अमरावती जिल्ह्यात ८ जानेवारीला गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला  या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस पडला. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तूर, कपाशी, पिकांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्यामुळे तब्बल १९ हजार ४७८ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.  तर अमरावती जिल्ह्यात नेरपिंगळाई भागात सर्वाधिक कपाशी पिकाचे तब्बल ३६८९ हेक्टर नुकसान झाले आहे, तर  ९७३ हेक्टर तूर, ३२२ हेक्टर संत्रा, ६१६ हेक्टर गहू, ११०७ हेक्टर हरभरा, १२० हेक्टर कांदा व १५२ हेक्‍टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –