राज्यात पुन्हा चक्रीवादळाच सावट; ‘या’ जिल्ह्यांना बसणार तडाखा

शिर्डी – राज्यात पुढील दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ आंध्रप्रदेश ते मुंबई व्हाया नगर, असा प्रवास अरबी समुद्रात जाणार आहे. एका समुद्रातून निघालेले वादळ भूभागावरून दुसऱ्या समुद्रात जाण्याची ही पहिलीच घटना आहे.

सध्या परतीच्या पावसामुळे राज्यात सर्वत्र गार वातावरण  तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळे बाष्पयुक्त हवा तयार झाली आहे. सध्या सर्वत्र राज्यात दमट हवामान तयार झालेले आहे. त्यातच चक्रीवादळाचा प्रवास दक्षिण नगर जिल्ह्यातून होणार असल्याने, येत्या बुधवारी आणि गुरुवारी या भागात पावसाचे मोठ्या प्रमाणात  वाढ होण्याची शक्‍यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी (१३ ऑक्टो) आज बंगालच्या उपसागरातील हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून नांदेडमार्गे गुरुवारी पहाटे (१५ ऑक्टो) जामखेडहून दक्षिण नगर जिल्हा पार करून दुपारपर्यंत मुंबईत पोहचेल.

या तयार झालेल्या चक्राकार वाऱ्याचा वेग ताशी २५ किलोमीटर एवढा आहे, तर पुढे सरकरण्याचा वेग १०-१२ किलोमीटर एवढा आहे. हे वादळ अरबी समुद्रात गेल्यानंतर ते पुढे वेगाने कराची दिशेने सरकरणार आहे. मात्र, या २ दिवसांत मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस होईल.

दरम्यान, अरबी समुद्रात गेलेले चक्रीवादळ दुसऱ्या दिवशी रौद्र रूप धारण करीन. तसेच याचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत वाढेल. तर सोमवार १२ ऑक्टोबरपासून ते शनिवार १७ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील हवामान ढगाळ आणि दमट राहिल. तसेच या ५ दिवसांत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –