Cyclone Mandous | ‘मंदोस’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम, तर राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Cyclone Mandous | 'मंदोस' चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम, तर राज्यात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

Cyclone Mandous | टीम महाराष्ट्र देशा: सध्या बंगालच्या उपसागरात मंदोस चक्रीवादळ (Cyclone Mandous) निर्माण झालं आहे. देशामध्ये निर्माण झालेल्या या चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टी वर देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत कोकण आणि परिसरामध्ये हवामान खात्याकडून पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि रत्नागिरी (Ratnagiri) या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे.

तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मंदोस चक्रीवादळामुळे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तमिळनाडू राज्यातील अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तमिळनाडू राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात थंडीचा दर थोडा कमी झाला असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे राज्यात थंडीचा जोर कमी होणार आहे. त्याचबरोबर या परिस्थितीत तापमानात चढ-उतार होण्याची देखील शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मंदोस चक्रीवादळामुळे तमिळनाडूच्या 13 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तमिळनाडूमधील शाळांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे. वादळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात, उत्तर तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या