दादा भुसे अचानक बांधावर, शेतकऱ्याचा डब्बाही खाल्ला

दादा भुसे

ठाणे – शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे हे मुंबईहुन नाशिककडे जात असताना त्यांनी मुंबई नाशिक महमार्गवरील कसारा घाट लगतच्या एका शेतात अचानक भेट दिली. या शेतात बांधावर शेतकरी मेहनत घेत असल्याचे दिसले. (लतीफवाडी) येथील सुनील दशरथ मांगे यांच्या बांधावर जाऊन नामदार भुसे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

जाणून घ्या ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे

शेतकऱ्यांना या भागात काय काय अडचणी आहेत त्या जाणून घेतल्या. तसेच, गावात कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक येतात का, बी-बियाणे, खते, औषधे यांची विचारपूस केली. यावेळी शेतकऱ्यांनीही आपल्या समस्यांचा पाडा वाचला कृषीमंत्री भुसे यांनी बांधावर असलेल्या शेतकऱ्याचा डब्बा घेऊन तो शेतकऱ्याच्या आग्रहास्तव खाल्ला. आपल्या बांधावर मंत्री आल्याने शेतकरी मांगे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी तंत्रज्ञान पोहोचवा – कृषीमंत्री

भाजीपाला, फळ, फूल पिकांच्या क्षेत्रांमध्ये वाढ करावी – दादाजी भुसे