दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण राज्यात अव्वल

ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करून पारदर्शीपणे कारभार करणारी पुणे जिल्ह्यातील दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण राज्यात अव्वल ठरली आहे. सन १९५९ मध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली असून १० एकरामध्ये या बाजार समितीचे वास्तव्य आहे.

ऑनलाईन गेट एन्ट्री, ऑनलाईन नोंदणी, मालाची प्रतवारी, ऑनलाईन मालाची लिलाव पद्धती, ऑनलाईन बोली पद्धती, २ वाजता शेतकऱ्यांच्या मालाची अंतिम बोली, शेतकऱ्यांना ऑनलाईन पेमेंट त्यांच्या खात्यावर जावून त्यानंतर शेवटच्या टप्प्यात माल बाहेर जाताना ऑनलाईन जावक होते.

या सर्व ऑनलाईन बाबींचा विचार करून केंद शासनाने पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० बाजार समित्यांची निवड केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यामधील दौंड व शिरूर या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत.