मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपर्यंत मुदत

मुंबई बाजार समिती

देशातील सर्वांत मोठी समजली जाणारी बाजार समिती म्हणजे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार हे लेखापरीक्षणात उघड झाल्यानंतर संचालक डॉ. सुभाष माने यांनी २६ जून २०१४ रोजी संचालक मंडळ बरखास्त केली. संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

यानंतर या बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. तसेच या बाजार समितीची निवडणूक ही ६ वर्षांनतर जाहीर झाली आहे. या मतदानातून १८ संचालकांची निवड होणार आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, वेगवेगळ्या गटांतील उमेदवारांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत बुधवारपर्यंत (ता.२९) असून, त्या अर्जांची छाननी ही गुरुवारी (ता.३०); तर अंतिम उमेदवारी यादी शुक्रवारी (ता.३१) प्रसिद्ध होणार आहे. मतदान २९ फेब्रुवारीला होणार असून, मतमोजणी २ मार्चला होईल.

यामध्ये मतदार संघ हे फळे विभाग- १, भाजीपाला विभाग -१ , मसाला विभाग – १, कांदा, बटाटा विभाग – १, अन्नधान्य विभाग- १, हमाल मापाडी -१.  एकूण – ६. त्याचप्रमाणे महसूल विभागनिहाय प्रत्येकी २ याप्रमाणे सहा विभागांनुसार- १२ संचालक आणि शासननियुक्त प्रतिनिधी – ५ (यात २ महिला, १ एनटी, १ एसटी, १ ओबीसी यांचा समावेश) व महापालिका प्रतिनिधी – २ असणार आहेत. त्यात अजून पणन संचालक -१ असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील पहिल्या ‘मोबाईल फूड टेस्टींग लॅब’ चा जयकुमार रावल यांच्या हस्ते शुभारंभ

कांद्याचे भाव घसरले , लासलगाव आणि पिंपळगावात आवकही घटली

राज्यातील प्रलंबित प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी खासदारांची समिती : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

डाळिंबाचे बाजारभाव कोसळले