वाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली ? शिवसेनेने युतीबाबत आताच निर्णय घ्यावा

मुंबई – केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत राहून भाजपावरच टीका करणाऱ्या शिवसेनेला आज भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी अल्टिमेटम दिल्याचे वृत्त आहे. शिवसेनेने युतीबाबत आताच निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेची निवडणूक घेऊ, असा इशारा भाजपाध्यक्षांकडून सेनेला देण्यात आल्याचे वृत्त आहे.

मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर शिवसेनेकडून सातत्याने होत असलेल्या टीकेमुळे भाजपामध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. जर शिवसेनेने युतीबाबत आताच काही स्पष्ट भूमिका घेतली नाही, तर राज्यातील विधानसभा बरखास्त करून लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकाही घेतल्या जातील, असा इशारा अमित शाह यांनी शिवसेनेला दिला आहे.