जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय – जयंत पाटील

जयंत पाटील

बीड – जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येतील यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात च्या क्षमतेत मोठी वाढ होऊ शकेल . जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात यामुळे वाढ होईल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी केले.

जिल्ह्यधिकारी कार्यालय येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल (दि. २८ ) रात्री उशिरा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, आ.संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शिवकन्या शिरसाठ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे,  जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा , जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा,  मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जलसंपदा विभागाचे अभियंता श्री शिनगारे यासह महसूल,जिल्हा परिषद,जलसंपदा विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जलसंपदामंत्री श्री पाटील म्हणाले जल सिंचन प्रकल्पांमध्ये गाळ साठल्याने त्याच्या पाणी साठ्यावर परिणाम होतो  आहे.  पाणी साठवण क्षमता वाढ गरजेचे आहे , जिल्ह्यातील पाणीसाठा क्षमता वाढवण्यासाठी साठवण प्रकल्पांचे उंची वाढविण्यासाठी प्राप्त होणारे प्रस्ताव यांचा विचार करून निर्णय घेऊ. सिंचनाचा मुख्य उद्देश कृषी उत्पादनात भरीव वाढ होवून ग्रामीण जीवन समृध्द करणे हा आहे त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने  मराठवाड्यात ज्या ठिकाणी कामाची आवश्यकता असेल तेथील कामे प्राधान्याने केली जातील, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले

यावेळी जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यातील जलप्रकल्प, त्यांची सुरू किंवा प्रस्तावित असलेली दुरुस्ती व अन्य कामे यांसह नवीन प्रस्तावित केलेली कामे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मागण्या आदी बाबींवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांचे आभार मानले.

याप्रसंगी शेती साठी पाण्याचे समान वाटप, सिंदफना, माजलगाव आदी प्रकल्पांसह जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांचा दुरुस्ती कामांचा आढावा आणि निर्माण झालेले अडथळे दूर करून कामे तात्काळ सुरुवात करावी असे निर्देश देण्यात आले.

यावेळी त्यांनी प्रकल्पाविषयी लोकप्रतिनिधींच्या सुचना विचारात घेवून योग्य ते निर्देश देवून ज्यांना कामे विहीत मुदतीत पुर्ण करण्यासाठी त्या कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

बैठकीत सुरुवातीला जलसंपदा विभागाच्या वतीने माहिती सादर करण्यात आली जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांची  माहिती, पुर्ण झालेल्या प्रकल्पांची  माहिती, कामे सुरू प्रकल्पांची सर्वसाधारण माहिती, प्रस्तावित प्रकल्पांबाबत, जिल्ह्यातील प्रकल्पांद्वारे निर्मित सिंचन क्षमता, चालू वर्षातील उपलब्ध आर्थिक तरतूद व आवश्यक निधी, जिल्हातील प्रकल्पात असलेला पाणीसाठा,  जिल्ह्यातील जलप्रकल्पांची सद्यस्थिती बाबत माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या –