अतिवृष्टीमुळे बाधित शेतजमिनी दुरुस्तीसाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचे बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

अतिवृष्टी

सातारा – जुलै महिन्यात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी (Heavy rain) झाली. या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील  शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रशासनाच्या पुढाकारातून शेतजमीनीच्या दुरुस्तीचे काम   करण्यात येणार असून खंडाळा येथे  पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते  दुरुस्तीसाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रींचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी व जेसीबी चालक  उपस्थित होते.जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rain) महाबळेश्वर तालुक्यातील शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले आहे. ही शेतजमिन जेसीबीच्या माध्यमातून दुरुस्त करण्यात येणार आहे. या मोहिमेध्ये महाबळेश्वर तालुक्यातील  81 गावांमध्ये जेसीबीच्या माध्यमातून दुरुस्ती करण्यात येणार आहे. शेतजमिनीच्या दुरस्तीच्या कामासाठी  जेसीबीधारकांना प्रशासनामार्फत मोफत इंधन देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत खंडाळा तालुक्यातील   84 जेसीबी,10 पोकलेन, 6 डंपर, 4 ट्रॅक्टर या कामासाठी सामाजिक दायित्व म्हणून महाबळेश्वर येथे काम करण्यास तयार झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –