खुशखबर : पेट्रोल आणि डिझेलचे दर 2.5 रुपयांनी होणार कमी

देशातील जनता वाढत्या इंधन दरांमुळे महागाईच्या झळा सोसत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल 91.34 रुपये तर डिझेल 80.10 रुपयांना विकले जात आहे. या पार्श्वभुमीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर 2.5 रुपयांनी कमी करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.

जेटली यांनी काल तेल उत्पादन कंपन्यांसोबत बैठक घेतली. यावेळी आढावा घेण्यात आला. जेटली यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने त्याची झळ देशाला बसली. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशातील इंधनाचे दर वाढले. कंपन्यांसोबत चर्चा करताना अबकारी कर खात्यासह इतर सर्व खात्यांशी चर्चा केली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतही चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रस्तावावर संमती दिली आहे.