‘या’ जिल्ह्यात यंदा खरिपासाठी तब्ब्ल ६० हजार ३९२ क्विंटल बियाणांची मागणी

सोयाबीन

नगर – ‘‘जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरिपासाठी तब्ब्ल ६० हजार ३९२ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. नगर जिल्ह्यात यंदा ६ लाख कापूस, बाजरी, सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याचा अंदाज गृहीत धरुन बियाणे मागणी केली असल्याचे कृषीखात्याकडून सांगण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ४७ हजार ९०४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्या वर्षी  ६ लाख ६३ हजार ९९० हेक्टरअधिक क्षेत्रावर लागवड झाली होती. त्यानुसारच यावर्षी ६ लाख ६७ हजार ६६० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. गेल्या तीन वर्षांच्या बियाणे विक्रीच्या सरासरीनुसार खरिपासाठी लागणाऱ्या बियाणांची दोन महिने पाजिलेच  मागणी केली जाते. नगर जिल्ह्यात २०१८ मध्ये ४४ हजार १८०, २०१९ मध्ये ५८ हजार ५५९ तर २०२० मध्ये ५१ हजार ४८५ क्विंटल बियाणाची विक्री झाली होती असं कृषीखात्याकडून सांगण्यात आले आहे.

त्यानुसार यावर्षी ६० हजार ३९२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली असल्याचं कृषीखात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यात खासगी कंपन्यांकडून ३३ हजार ९५३ क्विंटल, २१ हजार ७५५ क्विंटल बियाणे महाबीजकडून मिळणार असल्याचं सांगण्यात आले आहे. यंदा कापूस, बाजरी, सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याचा अंदाज गृहीत धरुन बियाणे मागणी केली असल्याचे कृषीखात्याकडून सांगण्यात आले आहे. पावसाळ्यातील परिस्थितीवर यात बदल होऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील मोहीम अधिकारी राजेश जानकर यांनी ही माहिती दिली.

बियाणे मागणी –

भात – ३५००

ज्वारी – १३

बाजरी – ५५००

मका – १०८५०

तूर – २५५०

मुग – २०२०

उडीद – ५२८०

भुईमूग – ५०५०

तीळ – ४

सूर्यफूल – ४५

सोयाबीन -२३,२२०

कापूस – २३६०

महत्वाच्या बातम्या –