चिमुकलीची सुप्रियाताई सुळेंना केळीला भाव मिळवून द्या, म्हणून मागणी

रावेर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सध्या उत्तर महाराष्ट्रात सुरु असून आज रावेर येथील सभेला राष्ट्रवादीचे नेते जळगाव हून रावेर साठी निघाले होते. वाटते निंबोरा या गावात देवानंद पाटील यांची केळीची बागेला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट दिली. त्यावेळी केळीला भाव नसल्यामुळे चिंतेत असलेल्या चिमुकलीने आज खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे केळीला भाव मिळवून द्या, म्हणून मागणी केली.

चिमुकलीची मागणी ऐकल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी केळीला भाव मिळवून देण्यासाठीच आम्ही ही हल्लाबोल यात्रा काढली असल्याची तिची समजूत घातली. तसेच आमचे नेते विधीमंडळात याबाबतीत आवाज उचलतील असे आश्वासन दिले. यावेळी शेतकरी देवानंद पाटील म्हणाले की, सध्या केळीला ७०० प्रति क्विंटल भाव मिळत आहे. आघाडी सरकारच्या काळात १००० ते १२०० भाव मिळत होता. करपा रोगाने यंदा केळीचे मोठे नुकसान केले असून त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. पिक विमा मिळायलाही अडचण येत आहे. त्यातच वीज बिल भरमसाठ आल्यामुळे ते भरले जात नाहीत. कर्जमाफी तर दुरच राहिली.