शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक कारणांशिवाय नैराश्य- अमित शहा

दावणगिरी: मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये १५ वर्ष भाजपची सत्ता आहे. तिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक कारणांशिवाय नैराश्य, मुलांना मार्क कमी मिळणे ही कारणे आहेत. असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज शेतकरी आत्महत्यांबाबत विधान केले.

अमित शहा म्हणाले, काँग्रेसचे शासन असेल त्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आणि भाजपचं शासन आलं की त्या कमी होतात, महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ३० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. आधी येथे काँग्रेसचे सरकार होते.

शहा यांनी दावणगिरी इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये १५ वर्ष भाजपची सत्ता आहे तिथे शेतकऱ्यांची आत्महत्येमागे वैयक्तिक कारणांशिवाय नैराश्य, मुलांना मार्क कमी मिळणे ही कारणे असल्याचे आणखी एक अजब विधानही त्यांनी केले आहे.