सरकारनं मदत जाहीर करूनही शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी कडू

शेतकरी

सोलापूर – जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2 हजार 297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरित करण्याचा आदेश काढण्यात आला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरित करण्यात येणार होता. दरम्यान, बळीराजाची दिवाळी गोड होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

मात्र परतीच्या पावसात उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी कडू झालीय. सरकारनं मदत जाहीर केली पण बहुतांश शेतकऱ्यांच्या हातात दिवाळी संपत आली तरी अजूनही सरकारी मदतीची फुटकी कवडी देखील आलेले नाही.

मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता पण तो पाळला नाही. सरकारी मदत मिळाली नसल्यानं राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली. सरकारनं १० हजारांचं पॅकेज जाहीर केलं पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटीच दिले. दिलेले पैसेही शेतकऱ्यांच्या हातात अजूनही पडलेले नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –