या रक्ताळलेल्या पावलांनी रस्ता देखील रडला असेल ( भाग दुसरा )

रात्र झाली होती सगळे खूप दमलेले होते गावाकडं काय चालू असलं याची विचारपूस सुरू होती. मीही त्यांच्या गप्पा ऐकण्यात दंग झालो होतो मी मोबाईल बंद केला होता. कुठला संपर्क नव्हता. मस्त जीवन वाटत होतं आता सगळे झोपण्याच्या तयारीला लागले कारण सगळ्यांना पहाटे 5 ला उठून मुंबई कडे निघाचं होत. मी खूप दमलो होतो मलाही झोप आली होती, राजू सुशांत ओबी इंजिनिर महेश ड्रायव्हर विनोद पाटील गप्पा मारत बसलो होते. त्या दिवशीच्या मुक्कामी खूप धमाल या टोळी ने केली मज्जा ही खूप अली पण अवघ्या मोर्चात पाटलाची 100 ची नोट लक्षात राहण्यासारखी झाली. मी ही आदिवासी गाणी ऐकत त्यांच्यात रमून गेलो मोबाईल ऑन केला आणि लगेच ऑफ़ीचा कॉल आला तू तयार थांब पतंगराव कदम गेले तुला सांगलीला जावं लागेलं.

काही वेळात कळवतो मात्र माझ्या मनात या लोकांना बदल आपुलकी निर्माण झाली होती अस वाटलं सागर तू शेतकऱ्यांचा मुलगा आहे नाही जाणार आणि तसच झाल ऑफिसने दुसरा रिपोर्टर तिकडे पाठवला होता मनात जिद्द असलं तर तसच होत. आणि अगदी झालं देखील तसच. रात्र सरत होती 1 वाजत आले होते शेतकरी झोपले होते निम्मे झोपण्याच्या तयारीत होते मीही झोपून गेलो सकाळी 5 ला सगळे उठले. मला लागली नव्हती कारण नाही मनात एक विचार होता ही लोक प्रवास कसा करत असतील गावाकडे संपर्क कसा करत असतील ? घरचे लोक याना टिव्ही वर बघत असतील का ? यांच्या घरी टिव्ही असलं का ? असे अनेक प्रश्न पडत होते पहाट असल्याने प्रत्येकजण नदी वर अंगोळीकरता जात होता. त्यांनाही माहीत होतं पुढील 3 दिवस अंघोळ मिळणार नाही, म्हणून सगळे नदीत मनसोक्त आनंद घेत होते. त्यांना तर रोजची सवय असेलं अस वाटत होतं. मात्र अंघोळ करत करत मुंबई कशी असेल असं ते एकमेकांत चर्चा करत होते. सर्वांच्या अंघोळी झाल्या सकाळचे 7 वाजून गेले होते मोर्चाला सुरवात होणार होती मी ही सर्व बघत होतो कॅमेरामन शूट करत होता.

मोर्चा सुरू झाला भातसा नदी मोकळी झाली होती नदीवर मी, राजू, सुशांत आम्हीच राहिलो कारण आम्हाला आवरायचं होत, कपडे कुणाकडेच नव्हते मग काय सगळा कानोसा घेत मारल्या नदीमध्ये उड्या तेच कपडे घालून आमचा प्रवास सुरु झाला. मोर्चा वळकस गावातून हायवेला लागला हायवे वर ही लोक थांबली होती. अजित नवले त्यांना दिवसच शेड्युल सांगत होते सर्व शांत पणे ऐकत होते. मात्र, मला प्रश्न पडला ही लोक आता चालायला सुरुवात करणार यांनी चहा ही घेतला नाही याना कसलं चहाच व्यसन नाही मात्र 2 किलोमीटर अंतरावर त्यांच्या चहाची व्यवस्था केली होती मी त्यातील एक आजीला विचारलं तुम्ही चहा पिलात का ? तेव्हा उत्तर आलं आता चहा पिले पण गावाला गेल्यावर चहा मिळालं की नाही माहीत नाही, मी विचारलं अस का ? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं रेशनकार्ड वर मिळणारी साखर बंद झाली आहे आणि मका सुरू झाली आहे आम्ही माणसं आहोत जनावर नाही मका हे खाण जनावर खातात माणसं नाही. असं सरकार 65 वर्षात कधी बघितलं नाही म्हणून तर मुंबईला घर दार जनावर सोडून आले आहे चहाचं काय कधी मिळतो कधी नाही पण मका खाऊन काय होणार ती पोटतिडकीने सांगत होती. बाळा चप्पल तुटली आहे तरी चालत आहे कारण मी चालले नाही तर माझ्या नातवंडांना ही आमच्या सारख जगावं लागलं. आमची रेशनकार्ड फाटले आहेत ते मिळाले पाहिजेत म्हणजे आम्हला सुखं जगता येईल मी चालत होतो ऑफिसचा फोन आला चांगली स्टोरी पाहिजे आणि लाईव्हला उभा राहा.

मग मी आणि सुशांत ओबी जवळ गेलो फ्रेम दिली लाईव्ह सुरू झाला तो पर्यंत मोर्चा 1 किलोमीटर पुढं गेला होता मग मीही लाईव्ह करून पुढं निघालो रस्त्यात अजित नवले दिसले त्यांची प्रतिक्रिया घ्याची होती कारण राज्यमंत्री रात्री भेट देऊन गेले होते त्यावर मी नवले याना विचारले तेव्हा ते म्हणाले सरकारच अजून कोणी ही आलं नाही जे आले होते ते सेनेचे म्हणूण. जर त्यांना वाटत असेल तर सेनेनं आता वाघ नख्या काढाव्यात व सत्तेवर लाथ मारावी आम्ही कोणाची ही मदत घेतली नाही घेणार नाही असं नवले सांगत होते. नवले मोर्चा प्रमुख असल्याने ते चालत होते त्यांच्या मागे शेतकरी. सर्व रस्ता लाल दिसत होता साऱ्यांचा हातात झेंडे होते रास्ताच्या बाजूला कोणी स्वागताला थांबलं होत कोणी मदतीला पण आदेश असल्या शिवाय कोणी काही घेत नव्हतं ही त्यांचो शिस्त होती.

मी एका 45 वर्षीय काकाला विचारलं का घेत नाही तेव्हा त्यांनी उत्तर दिलं आम्ही कोणच घ्याला आलो नाही तर आमचा हक्क घ्याला आलोय भांडायला आलो त्यांनी काही न घेता पुढं निघाले मी हे सगळं अनुभवत होतो मला आता उत्सुकता वाटत होती ही लोक का घेत नाहीत तेव्हा आपण हे जाणून घेतले पाहिजे असं वाटत होतं दुपारचे 12 वाजले होते मोर्चा बराच अंतर कापत पुढं सरकत होता ऊन वाढत होते कोणी ही थकलेले नव्हतं सर्व चालत होते त्यात एक आजीला चालत असताना चक्कर आली होती मी पळत गेलो त्यांना पाणी दिल व एका झाडा खाली त्यांना बसवलं. हे सर्व सुशांत शूट करत होत मी ही त्याला काही बोलो नाही मग विचारलं ही आजी चक्कर आली तरी चालत आहे. तेव्हा तिला विचारलं आजी आता तुम्ही आजारी आहात काय करणार तेव्हा तिने उत्तर दिलं मरण आलं तर चालेल पण मंत्रालयात जाणार तशी मागे जाणार नाही. माझ्यासाठी ही बातमी होती.

पण मी तेव्हा बातमीदार म्हणूण काम करत होतो मला बातमी ही महत्त्वाची होती मग मी आजी जवळ बराच वेळ बसलो अजून ही लोक आजीची विचारपूस करत होते पण आजी पायाला फोड आले चक्कर आली तरी पुढं चालायचं होत 2 वाजत आले होते सर्वांच्या चेहऱ्यावर भूक दिसत होती. काही वेळात दुपारचा विसावा येणार होता सोनावळे गाव दुपारी विसाव्यासाठी होत 1 किलोमीटर गाव बाकी राहील होत. रस्त्यांनी मीही चालत होतो. एकच शर्ट अंगात असल्याने पूर्ण घामाने शर्ट खराब झाला होता माझ्या सारखीच अवस्था राजू आणि सुशांतची झाली होती. शर्ट खराब असला म्हूणन काय झालं मोर्च्यात आलेल्या लोकांच्या अंगात ही तेच शर्ट आहेत घाम घाम झाल्याने काय झालं शेतकऱ्याला ऊन वारा पाऊस काही नसतो, मग आपण का अस जीवन जगून बघायचं नाही. शेतकऱ्याच्या शर्टचा आणि अंगाचा जो वास येत होता तो अत्तर पेक्षा ही मस्त होता.

मग चालत असताना असे अनेक स्टोरीच मिळत होत्या त्या आपल्या सगळ्या समोर आणत होतो प्रत्यकच दुःख वेगळं होत दुपारचा विसावा आला होता सगळे आपल्या अप्लाय माणसाना जेवणासाठी आवाज देत होते सर्वजण सोनावल गावाच्या मैदानात जेवण करत बसले होते गावकऱ्यांनी गार पाण्याची सोय केली होती तर भिवंडी मधून तेथील कार्यकर्ते घरोघरी जाऊन जमा केलेला शिदा शेतकर्यांन मदत म्हणून देण्यासाठी आले होते काही जण जेवण करून निवांत बसले होते मला ही भूक लागली होती मी महेश विनोद भूक लागली म्हूणन मुंबई वरून आलेल्या टीमची वाट पाहात होतो सर्व टीम ओबी जवळ आली मात्र थकवा घालवण्यासाठी विनोद पाटील आणि त्याची 100 ची नोट माझ्यासाठी मोर्चात करमणूक बनली होती काही वेळात ज्योत्स्ना ,मीनाक्षी, निखिला आल्या काही तरी वेगळं करायचं आहे असं ठरलं निखिला व ज्योत्स्ना निगुण गेल्या मी राजू विनोद पाटील आम्ही एका गावाच्या शेतकरच्या टीम मध्ये जेवण करण्यसाठी गेलो तिथं इंदू म्हणूण महिला होती. तिने आम्हला जेवण वाढवाल बोंबील बटाटा व रस्सा बटाट भात अस जेवण चुलीवर बनवलेलं मस्त लागत होतं माझ्या समोर राजू आणि पाटील होते राजू १०० रुपयांच्या नोटीचा विषय काढून त्याला चिडवत होता त्यांची मज्जा मी बघत होतो.

जेवण देणारी इंदू ही सगळं ऐकून पाटीलला चिडवत होती रात्री पण जेवण करायला या अस सांगत होती मीनाक्षी व मी सर्व बघत हसत होतो जेववन करत असताना कुठं ही सावली नव्हती आम्ही ही डोक्यावर ऊन घेत जेवण केलं आणि पुढचा प्रवास सुरु केल्या 4 वाजत आले होते रात्री उशिरापर्यंत ठाण्यातील मुक्कामी यायचं होत रस्ता कव्हर करत करत कल्याण वायपास आला होता सर्व कंपन्या सुटल्या होत्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती या वाहतूक कोंडीत 7 तास मी अडकलो जशी वाहतूक कोंडी सुटली तसा आम्हीं ही रस्ता कव्हर केला ठाण्यात मोर्चाला दाखल झाला

ठाण्यात मोर्चा दाखल झाला उद्या

( लेखक : सागर आव्हाड , पत्रकार TV ९ मराठी )