टीम महाराष्ट्र देशा : या अर्थसंकल्पातून राज्याच्या जनतेच्या हातात गाजराच्या पलीकडे काहीच मिळाल नाही, भाजप आणि शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनेतेच्या हातात पुन्हा एकदा गाजरच दिले आहे. अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेची घोर निराशा करणारा आहे तसेच जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याच काम सरकारने केलं असल्याचा घणाघाती आरोप विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
ज्या-ज्या योजना अर्थसंकल्पात आहेत त्या २०२२ आणि आणि २०२५ मध्ये पूर्ण होणार आहेत. असे असेल तर सरकारने मागील साडे तीन वर्षांत काय केले ? असा सवाल सुद्धा धनंजय मुंडे यांनी केला आहे.
राज्याचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शुक्रवारी दुपारी सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला. सुधीर मुनगंटीवार यांनी आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला.
पहा काय म्हणाले धनंजय मुंडे
शेतमाल तारण योजनेची राज्यभर व्यापक अंमलबजावणी करुन कृषि पणन मंडळाच्या आर्थिक सहभागाने गोदामांची उभारणी करण्याची नवीन योजना सुरु करु, असे त्यांनी सांगितले. राज्यातील १४५ मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषि बाजार पोर्टलवर आणणार आणि ज्यातील ९३ हजार ३२२ कृषि पंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी ७५० कोटी निधीची तरतूद, असे त्यांनी नमूद केले.