बजाज पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे धनंजय मुंडेंचे आदेश

dhananjay munde

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. तब्बल साडेपाच तास चाललेल्या या बैठकीत पुढील वर्षीच्या ३४४ कोटी रुपयांच्या विविध विकास कामाच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत बैठकीतील निर्णयांची माहिती दिली यावेळी बीडचे आमदार क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे उपस्थित होते. मागील सरकारमध्ये झालेल्या कारभारावर ताशेरे ओढताना भाजपच्याच आमदारांच्या तोंडून प्रि-फॅब्रिकेटेड अंगणवाड्याचा जवळपास २४ कोटी आखर्चित निधी परत गेला असल्याचे बैठकीत उघड झाल्याचे मुंडे म्हणाले.

तसेच पीकविमा संदर्भात ना. मुंडे यांनी ओरिएंटल व बजाज या दोन्ही प्रमुख कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत बैठक घेतली. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे २०१८ चा थकीत पीकविमा वाटपास सुरुवात केली आहे. तर ९०००० नाकारलेल्या शेतकऱ्यांच्या पिकविम्याबाबत २७ तारखेपर्यंत लेखी याद्या देण्याचे निर्देशही मुंडे यांनी यावेळी दिले.

तर जवळपास ७ लाख शेतकऱ्यांचे विमा वाटप थकवलेल्या बजाज कंपनीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही मुंडे यांनी दिले. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामाच्या व नवीन मंजुरीच्या बाबतीत लवकरच उच्चस्तरीय बैठक मुंबई येथे घेणार असल्याचेही मुंडेंनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या बैठकीस ना. धनंजय मुंडे यांच्यासह आमदार प्रकाश दादा सोळंके आमदार बाळासाहेब आजबे आमदार संदीप शिरसागर आमदार सुरेश धस आमदार विनायक मेटे बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिवकन्या शिवाजी सीरसाठ प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी आगवणे नियोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यास गुणकारी