धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुर्दैवी – विखे-पाटील

मुंबई : मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुर्दैवी आहे, असे ट्विट करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे. धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुर्दैवी असून त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. पाटील हे सरकारी अनास्थेचा बळी ठरले आहेत.

या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे हजारो शेतक-यांनी प्राण गमावल्यानंतरही सरकारला जाग येत नाही. ही बाब संतापजनक आहे, असेही विखे-पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.