…तोपर्यंत धर्मा पाटलांचं अस्थिविसर्जन करणार नाही – नरेंद्र पाटील

टीम महाराष्ट्र देशा: विखरण येथील प्रस्तावित वीज प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकरी धर्मा पाटील यांना कमी मोबदला मिळाला होता. त्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. मात्र, त्यांना यश मिळत नसल्याने त्यांनी नैराश्यात मंत्रालयाबाहेर विषप्राशन केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर शासनाने जिल्हा प्रशासनाला जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे आदेश दिले होते. आता जमिनीच्या फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. परंतु प्रत्यक्ष हातात मोबदला मिळत नाही, तोपर्यंत अस्थिविसर्जन करणार नाही, अशी माहिती त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.

अद्याप एकाही अधिकाºयाने आमची भेट घेतलेली नाही किंवा पत्रही पाठविलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मोबदला मिळत नाही; तोपर्यंत माझ्या वडिलांच्या अस्थिंचे विसर्जन करणार नाही, असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.