अतिवृष्टीचे अनूदान अद्याप न मिळाल्याने धारूरमधील शेतकरी हैरान

बीडमध्ये सुरवातीला झालेल्या कमी पावसामुळे  सोयाबीन आणि त्यासोबतच अनेक पिके वाया गेली होती. त्यांनतर परतीच्या पावसाने थोडीफार आलेलीही पिके सुद्धा पूर्णतः वाया गेली होती. त्यामुळे शासनाने नुसकान भरपाईची घोषणा केली. माञ धारूर तालुक्यातील आठ गावातील 5171 शेतकरी आजही या अनुदाना पासुन वंचित असल्याचे चत्र समोर आले आहे.आठ ते दहा गावचे 5171 शेतकरी यावर्षी खरीपाचे पिकाचे अतिवृष्टी मुळे झालेले नुकसान भरपाई मिळण्यापासून अद्याप वंचित आहेत.

हिवाळ्यामध्ये गरमऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करा

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. या नुकसान भरपाईचे हेक्टरी आठ हजार अनूदान देण्याची घोषणा केली होती. माञ भोगलवाडी, कासारी, बोडखा, कारी, कान्नापूर, चोरंबा आदी गावचे 5171 शेतकऱ्याचे 5546 हेक्टर क्षेञावरील पिकाचे नुकसान भरपाई अनूदान अद्याप मिळालेले नाही. यासाठी पाच कोटीपेक्षा जास्त रक्कम लागणार आहे.

धक्कादायक : प्रदूषण करणारे सर्वाधिक ५ हजार ३०६ उद्योग पुणे विभागात

दुष्काळी परिस्थितीत अतिवृष्टीचे अनूदान आता पर्यंत न मिळाल्याने या गावातील शेतकरी आता हैरान झाले आहेत. शासनाकडे वेळोवेळी मागणी करून या नुकसान भरपाईचे अनूदान मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. हे अनूदान तात्काळ वितरीत करावे अशी मागणी शेतक-यांनी निवेदना द्वारे केली आहे.