Digital Farming | टीम महाराष्ट्र देशा: भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. दिवसेंदिवस भारतातील कृषीक्षेत्र मजबूत होत चालले आहे. सर्व समस्यांना मात देत भारतीय शेतकरी उत्पादनात वाढ करत आहे. देशातील कृषी क्षेत्रात सध्या तंत्रज्ञानाच्या (Digital Farming) सहाय्याने विविध अभिनव प्रयोग राबवण्यात येत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार शेतीसाठी योजनांच्या माध्यमातून सहाय्य करत आहे. त्याचबरोबर शेतकरी प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करत आहे. अशात केंद्र सरकार शेतकऱ्यांची व्यवसाय ऑनलाइन करण्यावर जास्त भर देत आहे. त्याचबरोबर राज्य स्तरावर शेतकऱ्यांसाठी विविध ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे शेतकरी ऑनलाईन पिकांची खरेदी-विक्री करू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या कृषी विकासासाठी सातत्याने नवीन योजना राबवत असतात. दरम्यान, केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मदतीने इ-मार्केटिंगची प्रणाली विकसित केली आहे. शेतकरी ऑनलाइन ॲपच्या मदतीने आपला शेतीतील माल ऑनलाईन येऊ शकतात. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत देशातील 1.74 कोटी शेतकऱ्यांनी 22.22 लाख कोटी रुपयांच्या कृषी उत्पादनांची ऑनलाईन खरेदी-विक्री केली आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना मोठा नफाही मिळाला आहे.
देशामधील फळं आणि भाजीपाला विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातात. भारतातून धान्य, तांदूळ, साखर, दूध इत्यादी गोष्टींची बंपर निर्यात होते. देशातील कृषी क्षेत्राच्या वाढीमुळे भारतातील परकीय चलन गुंतवणूक वाढत चालले आहे.
केंद्र सरकार सध्या कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांतीवर भर देत आहे. डिजिटल कृषी मिशन हे आपल्या देशासाठी कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदलत आहे. त्याचबरोबर शेतकरी प्रगत तंत्रज्ञान वापरत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये थेट संपर्क होत आहे. यामुळे सरकारला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही मध्यस्थीची गरज भासत नाही.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी दिली – देवेंद्र फडणवीस
- IND vs BAN | बांगलादेशविरुद्ध कुलदीप यादवने केला ‘हा’ पराक्रम
- Maha Vikas Aghadi vs Bjp | भाजपचं उद्या ‘माफी मागो’ आंदोलन ; महाविकास आघाडीच्या मोर्चाला देणार उत्तर
- Sushma Andhare | “मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण त्याआधी…”; सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
- IPL vs PSL | आयपीएलबद्दल मोहम्मद रिझवानने केलं खळबळजनक विधान, म्हणाला…