दादाजी भुसेंशी चर्चा…; पुणतांब्याचं आंदोलन दोनदिवसांसाठी स्थगित!

दादाजी भुसेंशी चर्चा...; पुणतांब्याचं आंदोलन दोनदिवसांसाठी स्थगित!

पुणतांबा – गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुणतांबा येथे आंदोलन सुरु आहे. विविध मागण्यांसाठी शेतकरी(Farmers) आंदोलनात उतरले आहेत.त्यात आज दिनांक ०४ रोजी कृषिमंत्री दादाजी भुसे आंदोलनस्थळी पोहचले व दाराआड चर्चा करण्यात आली त्यांनतर हे आंदोलन दोन दिवस स्थगित(Postponed) राहील अशी शेतकरी नेत्यांनी घोषणा केली.

चर्चेत कृषिमंत्री दादाजी भुसे(Agriculture Minister Dadaji Bhuse) सहभागी होते तसेच किसान क्रांती नेते तसेच कोअर कमिटी चे सदस्य उपस्थित होते.हे सर्व पुणतांबा गावचे सदस्य होते त्यात शासकीय अधिकारी तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवर, शिर्डी लोकसभेचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी उपस्थिती दर्शवली.

जाणून घेऊयात मुख्य काही मागण्या ”शिल्लक ऊस जो बाकी आहे त्यांना हेक्टरी दोन लाख रुपये द्यावे. कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा, उसाला प्रति एकर एक हजार रुपये अनुदान द्यावे,कांद्याला प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान द्यावे, शेतकऱ्यांना सुलीत वीजपुरवठा करावा दिवस मुख्यतः, तसेच शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करावी, कांदा तसेच गव्हाची निर्यात बंदी चा आदेश माघे घ्यावा, २०१७ साली जी कर्जमाफी करण्यात अली त्याची अमंलबजावणी करावी, दुधाला कमीतकमी चाळीस रुपये दर देण्यात यावा, खासगी दूध संकलन केंद्रात जी लूट केली जाते ती थांबवण्यात यावी, वन्य प्राण्याचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई द्यावी.

अश्या अनेक मागण्यांवर आंदोलन चालू होते आज झालेल्या बंद दाराआड चर्चेनंतर २ दिवसासाठी आंदोलन स्थगित झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –