राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत ११ लाख ८२ हजार १३० शिवभोजन थाळ्यांचे वाटप – छगन भुजबळ

शिवभोजन थाळ्यां

मुंबई –  राज्यात दि. 1 जुलै ते दि. 12 जुलैपर्यंत 865 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 11 लाख 82 हजार 130 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले, असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात   30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 11 लाख 82 हजार 130 आणि असे एकूण दि.  1 एप्रिल ते दि. 12 जुलै या कालावधीत 1 कोटी 1 लाख 61 हजार 659 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या दालचीनीचे हे फायदे

अंडी का खावीत ? जाणून घ्या फायदे