सोलापूर जिल्ह्यात ३६ हजार शेतकऱ्यांना खते, बियाण्यांचे वाटप

खते, बियाण्यांचे वाटप

सोलापूर शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. म्हणून भारताला ‘कृषी प्रधान’ देश म्हटले जातात.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने संपवलं जीवन; आत्महत्येनंतर होतेय ‘या’ नावाची चर्चाशेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम “सुपीक” जमीन आणि नंतर “पाणी” लागते. शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य आहे. आवश्यक गोष्ट म्हणजे “मनुष्यबळ”. हे असले की शेतकरी शेतातील पिकांची निगा राखू शकतो.  शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी लागणारा “पैसा” (भांडवल). आणि जेथे तो त्याचा उत्पादित शेतमाल विकतो, ती “बाजार पेठ”.पण यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खत. शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य उद्योग करणारे लोक हे कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात.

‘ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’बाबत शरद पवारांनी सांगितल्या ‘त्या’ आठवणी

तसेच आपण कुठले पीक घ्यायचे त्यासाठी बियाणे लागतात. पिकाला कुठले खत द्यायचे. सध्या कोरोनाच्या स्थितीमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खते आणि बियाणांचे वाटप होत आहे. सोलापूर जिल्ह्यात शेतकरी गटांमार्फत ८८ हजार ६७० क्विंटल खते आणि २७८४ क्विंटल बियाण्यांचे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर वाटप करण्यात आले. त्यामध्ये शेतकरी गटाच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेल्या या खते आणि बियाणांचा जिल्ह्यातील ३६ हजार ३२४ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.

मॉन्सून झाला महाराष्ट्रात दाखल, मॉन्सूनने मारली सोलापूरपर्यंत मजल

पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या बांधावर खते आणि बियाणे उपलब्ध करून द्या, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार खते आणि बियाणे वाटपास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार आत्मा योजनेअंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या जिल्ह्यातील ७ हजार ९६५ शेतकरी गटांची मदत घेण्यात आली.
कृषी विभागानेही त्यासाठी तयारी केली. तसेच खते, बियाणांचा पुरवठा करण्यात आला.

तुम्हाला सतत चहा पिण्याची सवय आहे, तर मग चहामध्ये ‘हे’ पदार्थ ठरतील लाभदायक……..

युरिया २३५४१०, डीएपी १०५७०० क्विंटल, म्युरेट ऑफ पोटॅश १३५८०० क्विंटल, एनपीके -१२९८०० क्विंटल; तर सिंगल सुपर फॉस्फेट ६१५०० क्विंटल खते उपलब्ध झाली आहेत. त्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार म्हणाले की, आम्ही आत्तापर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत नियोजनपूर्वक खते आणि बियाणांचे वाटप केले आहे. याशिवाय शेतकऱ्यांची आणखी मागणी वाढल्यास पुरवठा करू.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांनी केली तक्रार ; बायोमेट्रिक अंगठे न आल्यामुळे कर्जमाफीपासून वंचित

‘स्वाभिमानी’मध्ये सर्व आलबेल, शेट्टींच्या विधानपरिषद उमेदवारीवर शिक्कामोर्तब