‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’कडून शेतकऱ्यांना खरीप बियाण्यांचे वाटप

खरीप बियाण्यांचे वाटप

सोलापूर – राज्यात जूनच्या सुरुवातील समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली आहे. यंदाच्या वर्षी वेळेवर पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीलाही सुरवात केली आहे. कोरोना साथरोगाराच्या काळात देशभरात लॉकडाऊन चालू आहे. कोरोना आणि लॉकडाउनचा काळामध्ये शेतकऱ्यांचे खुप हाल होत आहेत. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपासाठी बियाण्यांचे नुकतेच वाटप करण्यात आले.

झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ? ऊसतोड मजुरांसाठी पंकजा मुंडे आक्रमकजिल्ह्यातील सोनलकरवाडी (ता. माढा), ऊळे (ता. द. सोलापूर), डोणज (ता. मंगळवेढा) या ठिकाणी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये साठ शेतकऱ्यांना तूर, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी, चवळीच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

कांदा विक्रीचे प्रतिकिलो पाच रुपये असे अनुदान नूकासन भरपाई म्हणून द्यावे ; कांदा उत्पादकांची मागणी

तसेच गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या उगवणीबाबत तक्रारी होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, बियाणे बदलून द्या, अशी मागणी यावेळी या करण्यात आली . यापुढेही शेतमालाला योग्य दरासह शेतीच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भांडेल, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आश्वस्त केले.

महत्वाच्या बातम्या – 

उर्वरित शेतकरी कर्जमाफीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा…

कृषी विकासात अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे मोठे योगदान – महसूलमंत्री