जिल्हा ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस हेल्थ ॲप्लिकेशन व इतर उपक्रम महत्वपूर्ण ठरतील – यशोमती ठाकूर

यशोमती ठाकूर

अमरावती – कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल अहोरात्र कार्यरत असते. कोरोना काळातही त्यांनी जीवाची बाजी लावून अमूल्य योगदान दिले. अशा तणावपूर्ण आयुष्यात आरोग्य व मनाचा समतोल जपण्यासाठी योग- व्यायामाबरोबरच सकारात्मकता, तसेच ‘हेल्दी थिकिंग’ची आवश्यकता असते. त्यासाठी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस हेल्थ ॲप्लिकेशन व इतर उपक्रम महत्वपूर्ण ठरतील. यापुढेही दलाच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा चांगल्या उपक्रमांना शासनाकडून आर्थिक बळ मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

जिल्हा ग्रामीण पोलिस दलातर्फे आशियाना क्लब, जोग क्रीडासंकुल, पोलिस अधीक्षक कार्यालय नूतनीकरण तसेच पोलिस हेल्थ ॲपचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, पोलिस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, श्रीमती श्वेता के. हरी बालाजी, अपर पोलिस अधिक्षक श्याम घुगे, डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, डॉ. अनिल रोहणकर, डॉ. स्वप्नजा निंभोरकर, पोलिस उपअधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, राखीव पोलिस निरीक्षक दीपक गेडाम आदी उपस्थित होते.

आशियाना क्लब येथे व्हीआयपी कक्ष, विश्राम कक्ष, पोलिस अधिक्षक कार्यालयात जलद प्रतिसाद पथक व दंगा नियंत्रण पथक, पुरुष व महिला बराक, ग्रामीण अधिकारी, अंमलदारांसाठी मेस, स्मृतिभवन, उपाहारगृह, तर जोग स्टेडियम येथे वॉकिंग ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट, व्हॉलीबॉल मैदान, लॉन टेनिस कोर्ट, कबड्डी मैदान, मंथन सभागृह, अन्नपूर्णा मेस, बॉईज बराक, 400 मीटर ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट आदी विविध सुविधांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला. श्रीमती श्वेता के. हरी बालाजी यांनी या सुविधांच्या नूतनीकरण व निर्मितीसाठी योगदान दिले आहे. दलासाठी 12 बलेरो व 18 बाईक या वाहनताफ्याचा शुभारंभही यावेळी झाला.

महत्वाच्या बातम्या –